तिच्यासाठी झुरू नकोस…
तिच्यासाठी झुरू नकोस…
ती एक स्वप्न आहे,
स्वप्न तिचं बघू नकोस…
पाहिलंस जरी स्वप्न तिचं,
तिच्यासाठी जगू नकोस…
अविचारी मन तिचं,
विचार तिचा करू नकोस…
केलास जरी विचार तिचा,
तिच्यावरती मरू नकोस…
पुसून टाक अश्रू तुझे,
डोळे तुझे भिजवू नकोस…
नाही पडत फरक तिला,
तिच्यासाठी झुरू नकोस…
खूप प्रेम करतोस तिला,
व्यक्त मात्र करू नकोस…!