STORYMIRROR

PRAJAKTA PARDHE

Romance

3  

PRAJAKTA PARDHE

Romance

चिरंतर

चिरंतर

1 min
11.8K

नशा तुझ्या डोळ्यातली,

चढे धुंद मनावर...

स्वर तुझ्या हसण्याचे,

हे गीत चिरंतर...


धड-पड या जीवाची,

ही ओढ अनावर...

भास तुझ्या असण्याचे,

हे वेड चिरंतर...


वळे नजर चंचल,

आता तुझ्या वाटेवर...

नाव तुझे जपण्याचे,

घे वचन चिरंतर...


वाटे गोड तुझा राग,

की मोहिनी मनावर...

रंग पेरण्या आला,

हा क्षण चिरंतर...


हवी तुझ्या स्पर्शाची,

ती हळुवार फुंकर...

मिठी तुझी माझ्यासाठी,

आहे विश्वास चिरंतर...


तुझ्या माझ्यातले आज,

सारे मिटावे अंतर...

हात माझ्या हाती तुझा,

सांग देशील का चिरंतर...???


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from PRAJAKTA PARDHE

तू

तू

1 min वाचा

बाप

बाप

1 min वाचा

Similar marathi poem from Romance