बाप
बाप
1 min
406
धूसर त्याची प्रतिमा कधीच स्पष्ट झाली नाही
लोटली जरी वर्षे धुकं मात्र हटलं नाही
कोडं त्याचा स्वभावाचं माझ्याने कधीच सुटलं नाही
असा माझा बाप मला कधीच कळला नाही
वाढत गेली वयं तशी वाढत गेली दुरी
शब्दांची पडली कसर केली भितीने पुरी
बदलता प्रवाह पुडेही कधी थांबला नाही
असा माझा बाप मला कधीच कळला नाही
बाबा सतत अस्पष्ट काही चुकलं तरी गोंधळ
नाही पडलं कमी काही,
मागण्या आधीच सगळं हजर
मग आदरार्थी भितीने
अल्लडपणा पाळलाच नाही
असा माझा बाप मला कधी कळलाच नाही
