तुझ्या सहवासाची
तुझ्या सहवासाची


तुझ्या सहवासाची
हवी सोबत सुखाची
आनंदाने उधळणारी लहरींची
सोडूनी रुसवा मनाचा
धुंद होऊनी विहरण्याची
तुझ्या सहवासाची
हवी सोबत प्रेमाची
न तुटणारी बंधनाची
राहुनी गोड स्वप्नात
सर्व काही विसरण्याची
तुझ्या सहवासाची
हवी सोबत विश्वासाची
दुःखात एकमेकांना सावरण्याची
आली कितीही संकटे
राहुनी सोबती झेलण्याची
तुझ्या सहवासाची
हवी सोबत जीवनाची
शेवटपर्यंत चालणाऱ्या प्रवासाची
ना मी मागता ना तू मागता
सर्व काही एकमेकांना देण्याची....
तुझ्या सहवासाची
हवी सोबत सात जीवनाची............