पहिला पाऊस आणि पहिल्या आठवणी...
पहिला पाऊस आणि पहिल्या आठवणी...


पहिल्या वहिल्या पावसात चिंब भिजलो मी
शब्द उरेना अंत भावनातुन मग पाऊस येई
पहिला पाऊस अन् पहिल्या आठवणी...
धीर धरवेना मला, मी झालो पाऊस वेडा
अचानक उसळे गारा गोट्यांचा पाऊस
पहिला पाऊस अन् पहिल्या आठवणी...
सुरज झाले मधुर अन् पाऊस धो धो
अधून-मधून वीज चमके
पहिला पाऊस अन् पहिल्या आठवणी...
धुके दाटून आले मग आभाळ होईल काळेभोर
डोळ्यात अन् हृदयात होई धडधड
पहिला पाऊस अन् पहिल्या आठवणी...
मेघनाच्या अचानक धो बरसू लागले
तेव्हा रस्ता अन् आनंद होईल तुडुंब
पहिला पाऊस अन् पहिल्या आठवणी...