STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

3  

Sanjay Gurav

Romance

डोळ्यातल्या डोहामध्ये

डोळ्यातल्या डोहामध्ये

1 min
11.9K

गुंतायचे की सुटायचे तव

डोळ्यातल्या डोहामध्ये?

सावरावे की सहज लुटायचे

सांग डोळ्यातल्या डोहामध्ये?


गहरी किती आवर्तने अगणित

तुझ्या डोळ्यातल्या डोहामध्ये

मंत्राविन कशी काळीज मोहिनी

तुझ्या डोळ्यातल्या डोहामध्ये


अबोल जरी तू असतेच एरवी

शब्दसडा डोळ्यातल्या डोहामध्ये

कडेलोटाला टाळू सांग कसा तूच

सैल कडा डोळ्यातल्या डोहामध्ये


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance