Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harshada Dalvi

Inspirational

2.6  

Harshada Dalvi

Inspirational

" स्त्री जन्म "

" स्त्री जन्म "

2 mins
24.8K


मन मंदिरातील असशी तू

एक असाधारण देवता

अन्नपूर्णा तू, गृहलक्ष्मी ही तू,

आणि तूच आहेस दुर्गा माता ।


रोमा रोमात तुझ्या भरलीये

ममता आणि कणखरता

विलक्षण तेजोमय

अशी तुझी अस्मिता ।


स्वतःच्या आयुष्याची

करुनी सहाण,

संसारात ओततेस

तुझे पंचप्राण |


स्वतःला झिजवतेस

होऊनी चंदन

आणि प्रेमाच्या सुगंधाने

जपतेस तू प्रत्येक मन ।


प्रतिकुलतेने झालीस तू

दुष्ट कैकयी आणि गांधारी

पुत्रप्रेमापायी केलीस तू

मात सर्वांवरी |


लोक निन्देने दिव्य करण्याची

वेळ तुझ्यावर आणली

अग्निपरीक्षा देण्यासाठी

सीता ही तयार झाली ।


लंकेत ही स्वतःचे अस्तित्व जपणारी..

तू सती मंदोदरी |


झाशीची तू मनकर्णिका

तू राणी पद्मिनी ...

राखलास तुझा तू स्वाभिमान

होऊनि रणरागिणी ।


मधुबाला तू आणि माधुरी ही तू

अनोख्या सौंदर्याची मस्तानी ही तू ...

सावित्रीबाई तू, बहिणाबाई तू,

इंदिरा ही झालीस तू ।


लता दीदी आणि आशाताई तू ,

आणि तूच सुधा मूर्ती

कर्तृत्वाची तुझ्या पसरली

जगात सर्वदूर ही कीर्ती ।


धरणी तू, संजीवनी तू, दामिनी तू,

नंदिनी तू, भगिनी तू आणि अर्धांगिनी ही तू ,

तुझ्याशिवाय राहते एक अपूर्णता

तूच आहेस खरी जीवन सरिता ।


असा हा स्त्री जन्माचा आलेख मी मांडला ,

वंदन माझे यांना ज्यांचा देते मी दाखला ...


पहिले वंदन श्री रामाला


त्याने आईचा शब्द पाळला,

त्याग करुनी राज्याचा

वनवासाला निघुनी गेला ...

सावत्र आईला ही लळा लावला

कुमातेला पश्चाताप घडविला ।


दुसरे वंदन श्री कृष्णाला


मातृसुख दिले यशोदेला

गोपिकांचा मित्र बनला

द्रौपदीसाठी धावुनी आला

स्त्री जातीचा सन्मान वाढविला |


राधेच्या प्रेमात

श्रीकृष्ण आकंठ बुडाला,

तर पार्वतीच्या भक्तीने

नीलकंठ ही निवळला |


असा सोबती ज्यांना मिळाला

स्त्री जन्म तो सार्थ झाला ।


एक स्त्री म्हणुनी आज जगताना

देते ही मानवंदना ...


माझ्या आई बाबांना,

माझ्या गुरु जनांना,

आणि माझ्या दीपस्तंभांना

ज्यांनी वेळोवेळी

दिशा दाखवली

माझ्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांना ।


Rate this content
Log in