मैत्री .. अदृश्य दुआ
मैत्री .. अदृश्य दुआ
1 min
221
माझ्यातला मी .. तुझ्यातला तू
मनाला जोडणारा मनाचा सेतू
मी इथे आणि तू तिथे
कधी वाटते रिते रिते
पण जेव्हा या उंच आकाशी पाहते
मन माझे अल्लड वार्या संगे झुलते
हसत हसत गाते
गाता गाता फुलपाखरू होते
रंगीबेरंगी पंखं लावून
उडत गिरकी घेत.. तुझ्यापाशीच येते ।
काय म्हणावे हे कसले नाते
पण अंतरीच्या डोही असे काहीतरी घडते
की, सुंदर आठवणीने मन उभारी घेते
अन् मैत्रीच्या ओढीने सुखावत जाते .. ।
