जीवन चित्र
जीवन चित्र
जन्म हा लाभला मानवाचा,
आहे ईश्वराचे देणे हे ..
पण कालांतराने आयुष्य हे
वाटते जणू
चुलीवरच्या कढईतले ‘कांदे पोहे ‘ ..
‘ विस्तव ते वास्तव ’ मर्म आगळे हे
चटके सोसत जगण्याचे
गणित वेगळे हे ।
आयुष्यात ह्या शान - मान - इमान
आणि बरंच काही ..
पण फक्त प्रत्येकाचं जगणं
मात्र ‘समान’ नाही ।
म्हणून कधी हसावं लागतं ,
तर कधी रडावं लागतं..
आणि श्वास असेपर्यंत
या दुनियेला जगून दाखवावं लागतं ।
तरीही अगदीच काही वाईट नाही
हे जीवनाचे चित्र
कारण ,
नकळत ह्या चित्रात रंग भरतात
.. तेच खरे मित्र ।
फुलपाखरासारखे बागडत
तर कधी सुसंवाद साधत ..
एकमेकांसि घालुनी साद
करा रोज एक नवीन सुरूवात ।
अहो काहीही नसते कायम
या जीवनी..
म्हणून आनंदाने जगावे
क्षणोक्षणी ।
