STORYMIRROR

Harshada Dalvi

Inspirational

3  

Harshada Dalvi

Inspirational

आषाढ

आषाढ

1 min
29.2K


धूंद कुंद भिजून सूरु झाला आषाढ मास

मुसळधार वृष्टीने ओले केले जनामनास


दाटलेल्या अंधुक प्रकाशात

मेघदूत आणि शाकुन्तलाचा होत असे भास

जणू काव्य करावयास अवतरले

महाकवी कालिदास


भेटी लागी जीवा लागलीस आस

वारकरी बंधूंचा विठ्ठल दर्शनाचा ध्यास


विठु माउलीचा हरी नामाचा

गजर अखंड घुमला

भक्तांचे निस्सीम प्रेम पाहुनी

पंढरीचा राजा प्रसन्न झाला


एकादशी सरता सरता

पंढरपूर झाले शांत

पुढे अध्यात्माच्या ओघात

हरखून गेले सर्वांचे चित्त


पौर्णिमा घेउनी आली

सुखद चंद्रप्रकाश

शिष्य गणांना आशीर्वाद देण्यास

प्रकटले स्वयं महर्षी व्यास


व्हावे गुणी शिष्य

अर्जुनएकलाव्या परी

तरच वरदहस्त राहतील गुरुंचे

कायम आपल्या डोईवरी


गुरु - शिष्याचे हे नातेच वेगळे

मोठ्या भाग्यानेच गुरु जनांचा सहवास मिळे


चातुर्मासाचा आरंभ होतो

याच महिन्यात

सोबत सात्विक आहार आणि पोथी वाचनाची ही

होते सुरुवात


जेथे ज्योती तेथे लक्ष्मी

उभी जगाच्या सेवा धर्मी


अंधार दूर करून दिवे आणतात

नवीन उर्जा

आषाढ अमावास्येला करूया

दिव्यांची मनोभावे पूजा


असा हा आषाढ मास

जीवनात जोडतो नवा अर्थ

दीप पूजनाने रात्र उजळून

होतो शांतपणे समाप्त


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Inspirational