STORYMIRROR

Harshada Dalvi

Romance Inspirational

4  

Harshada Dalvi

Romance Inspirational

राजा राणी बनुया

राजा राणी बनुया

1 min
222

कोण असतो हा ‘राजा’ .. 

कोण असते ही ‘राणी’ ..

प्रश्न हा नेहमीच येतसे मनात

खरंच असतील का असे कोणी ??


​करुनि एकमेकांचा विचार, 

व देउनि एकमेकांसि आधार ..

अंधारातील होउनि दीपस्तंभ

उदयास यावा नवा आरंभ  । 


कधी पुढे - कधी मागे 

तर कधी राहूनि बरोबरीने , 

साथ द्यावि एकमेकांस

श्रद्धा आणि सबुरीने  । 


राजा राणीचे हे विशेष स्थान 

पटकावे एकमेकांच्या हृदयात..

आणि राजमहालाचे सुख जाणावे.. 

आपुल्या लहानशा उबदार घरट्यात  ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance