STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

तसाही ... आता फारसा फरक उरला .

तसाही ... आता फारसा फरक उरला .

2 mins
27.3K



जनावरं आजही पाळतात त्यांचा आचारधर्म,

ते स्वजातीला सहसा नडत नाहीत

मात्र माणसाच्या बाबतीत असे घडलंच

याची शाश्वती नाहीच देता येत ....

जनावरांना स्वार्थासाठी फसवत येत नाही कधी कुणाला

कारण बुद्धी त्याला कामापुरतीच

माणसाला मात्र मिळाली जरी भरभरून

पण तो त्याचा उपयोग कल्याणासाठी करेलच खात्री नाही

तसाही ... आता फारसा फरक उरला नाहीच माणसात आणि जनावरात ...// धृ //


दोघंही नाकात वारं गेलं की उधळतात .. चौफेर ...

मग त्यांना वेसण घालावीच लागते

फरक फक्त एवढाच कि ...

त्याला दावणीला बांधव लागतं ,

हा आपसूक स्वतःला बांधून घेतो

एकाला सांभाळण्यासाठी रिंगमास्टर लागतो तर ..

दुसऱ्याला ब्रेन मास्टर निष्णांत ..

फरक फक्त एवढाच कि... एक जन्मजात गुलाम तर

दुसरा गुलाम बनवावा लागतो कसरतींन ...

तसाही ... आता फारसा फरक उरला नाहीच माणसात आणि जनावरात ...// धृ //



माणूस म्हणा कि पोळ्याचा बैल ...

दोघांनाही मालक असतात , पालक असतात …

फरक फक्त एवढाच कि एकाला मालक निवडण्याचा ,

बदलण्याचा हक्क , दुसऱ्याला नसतो

यालाही मिळतो खुराक ,त्यालाही मिळतो

एकाला न मागता वेसन असते दोघांनाही

फरक फक्त एवढाच की एकाला अक्कल कमी असते ,

दुसरा असलेली वापरत नाही इतकंच

तसाही ... आता फारसा फरक उरला नाहीच माणसात आणि जनावरात ...// धृ //


हौशा - गवशाची बैल जोड ...

उधळत चौफेर ... कुणी घालावा लगाम ?

होते देवाला सोडलेले वळू...

खाऊन खाऊन पोसले , लागले गावाला छळू

काय वर्णावी त्यानच्या करामती कमी पडतील

कित्येक दिन - राती ...

काय करणार ? गावक-यांनी निर्णय केला

हणम्या पैलवानाला वहितीस दिली

मुकी बिचारी काय करणार ? कुणीही हाका .

सा- या उपद्वापाचा निचरा झाला ....


हणम्या पैलवान भलताच बेरकी ...

त्याने घातली वेसण दिले फटके दुकानावर ...

शेतात राबता - राबता तोंडी फेस आला ..

मनी म्हणाले भोगा आता कर्माची फळे ...

आयतं खाणं गोड नाही लागलं ...

मरा आता शेतात आशेच जन्मभर ....

उशिरा आलेला शहाणपण काय कामाचं ?

वेळ गेल्यावर कळून आलं ...

तसाही ... आता फारसा फरक उरला नाहीच माणसात आणि जनावरात ...// धृ //


जनावरं राबतात धन्याच्या भीतीपोटी ...

तर कधी पोटासाठी .. पोटापुरतेच ....

पण माणसाचं मात्र ना पोट भरतं कधी ,

प्रसंगी इमानही विकतो तो स्वार्थासाठी

वेळ अली कि त्यालाही पुजतात ...

सजवतात पोळा सण आल्यावर ...

यालाही पूजतात... सजवतात .

एरवी दोघानाही राबावच लागत धन्यासाठी

तसाही ... आता फारसा फरक उरला नाहीच माणसात आणि जनावरात ...// धृ //



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational