STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

बहीण

बहीण

1 min
276

जीव होतो कासावीस

वाट पाहण्याची आस

तुझा लागला ढास

आज रक्षाबंधन दिवस


तुझ्या मायेचा झरा

आठला नव्हता कधी खरा

तुझी लागली ठेस

आज रक्षाबंधन दिवस


दरवर्षी तुझी आठवण

येते पुन्हा पुन्हा स्मरण

लागतो तुझा कस

आज रक्षाबंधन दिवस


तुझा आरतीचा ताट

आणि बसण्याचा पाट

बघतोय आता वाट

आज रक्षाबंधन दिवस


तू बांधलेली राखी

अजून ठेवले जपून

आज बघतो जीव भरून

आज रक्षाबंधन दिवस


तुझ्या येण्याचा ध्यास

होतोय आता भास

येते का ताई

आज रक्षाबंधन दिवस



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational