STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

4  

Supriya Devkar

Inspirational

नवीन सुरुवात

नवीन सुरुवात

1 min
330

खचलेल्या मनाला सांग थोडासा ब्रेक घे

विश्रांतीची गरज आहे एक तरी टेक घे


विचारांना शांत कर निरभ्र आकाशाकडे बघ

निळ्याशार आकाशात धावणारे ढग बघ


नवीन सुरुवात करायची तर पाटी कोरी असावी

मनातली जळमट दूर करत चेहऱ्यावर लकाकी दिसावी 


दुर्लक्ष कर अपयशाकडे पुन्हा वाटचाल सुरू कर

केलेल्या चुकात दुरुस्ती करून प्रयत्नांना साध्य कर


नव्या आव्हानांना तोंड देत पावले पुढेे टाकत राहा

सकारात्मक विचारांनी जगाला नव्याने पहा


बघ तुझा आत्मविश्वास पुन्हा नव्याने वाढेल

 जगण्याची नवी उमेद सुख पदरात पाडेल 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational