STORYMIRROR

Prakash Chavhan

Inspirational

4  

Prakash Chavhan

Inspirational

श्वास जगण्याचे आले

श्वास जगण्याचे आले

1 min
291

श्वास जगण्याचे आले 

स्वातंत्र्याच्या पर्वातुन 

वीर आले वीर गेले 

या पवित्र भूमीतून 


एक होत क्रांती केली 

पारतंत्र संपवून 

रक्त रक्तासाठी गेले 

मातृभूच्या प्रेमातून 


खुली केली वाट आम्हा

 प्रेम धाग्यात ओवून 

दिस साजरा करतो 

ध्वज नभी फडकुन  


सयामधी हुरुप भरती 

शौर्या चे ते गुणगान 

पर्वा नसे जीवाची या 

देतो वीर बलिदान 


शत्रू वारं ते झेलुनी

रक्षा करतो सीमेची 

वीर आले वीर गेले 

 शांती नांदून सुखात 


ध्वज वंदु सारे जन 

मातृभूमी चरण स्पर्शू 

शौर्या चे गाऊनं गाणं 

 शोभे स्वातंत्र्याला साज 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational