रक्षाबंधन
रक्षाबंधन
सण आहे हा रक्षा बंधनाचा,
बहीण भावांच्या पवित्र नात्याचा
जरी जोडी ही टाॅम ॲन्ड जेरीची,
तरी माया असे ही बहीण भावाची
चिंता नसे ती कधी बहिणीला,
बंधू येई धावूनी सदा संकटाला
असे आधार भक्कम तिला भावाचा,
अन ठेवा कसा हा गोड प्रेमाचा
बहिणीत दिसे अशी ही आईची माया,
कशी भावात वसे अशी बापाची काया
