STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

नातं

नातं

1 min
239

विश्वासाचा एक धागा 

जोडी मने एक मेका 

नातं जीवन भराचा 

टिकवण्या देई ठेका


नातं तुझं आणि माझं 

कळे आपल्या मनाला 

साऱ्या जगात वेगळं 

दोन जीवांचा जिव्हाळा


नाते मैत्रीचे सुंदर 

देई हक्काचे दालन 

सुख-दुःख सांभाळून 

करी मनांचे मिलन


नाते प्रीतीचे मोहक 

प्रेम ठेवी टिकवून 

त्याग, आदर, भावना 

एकमेकां दाखवून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational