मैत्री प्राण्यांशी
मैत्री प्राण्यांशी
बागेतील खारूताईला
रोज न्याहाळायचे
येताजाता तिचे
कर्तब बघायचे
दिसता आपण
काढे पळ
होते सुरू
तिची चुळबूळ
जपलं तिला
प्रेमाने जर
घट्ट होते
मैत्री तर
मैत्रीचा आपला
स्वीकारते हात
कधीच न
सोडण्यासाठी साथ
प्राणी सुध्दा
बोलतात आपल्याशी
एकरूप होऊन
जातात मनाशी
लावता आपण
त्यांना लळा
भरून येतो
समाधानाने गळा
केली त्यांच्यावर
थोडी दया
बदल्यात मिळते
खूप माया
