कोरोना महामारी
कोरोना महामारी
अशी कशी हो महामारी
ही गरीबाला मारी
चिंता भाकरीची करी
दररोज भीती तुझी उदरी
नाही कुणीच सुटला
तुझ्या भयान विळख्यातून
जा एकदाचा रे बाबा
राक्षसी रूप जाऊ दे जगातून
छोटे,मोठे उद्योग बुडाले
मजूर,कामगार उपासी मेले
शिक्षणाचे वाईट दिवस आले
जीवन भकास तू केले
काय खावे माणसाने
काय खावे मजूराने
घरकामे महिलांची गेली
तुझ्या भयंकर भीतीने
गरीब,श्रीमंत तुझ्या लाटेत
कलाकार,कलावंत विळख्यात
भीक मागायची वेळ त्यांच्यावर
असा,कसा रे कोरोना तू जगात
किती लढले रे तुझ्याशी
ठरले शेवटी अपयशी
सोने,नाण्याचा झाला चुराडा
हातची माणसी गेली हो अशी
शासन यंत्रणा झटते अहोरात्र
माणसे वाचविली एक,एक
असा महाराष्ट्र माणूसकीवान
जीव वाचविले कित्येक
तरी महाराष्ट्र माझा,
लढतो अजून रे तुझ्याशी
नाही हटणार,नाही झुकणार
कीव येऊ दे रे तुला जराशी
तुझे समूळ उच्चाटन
महाराष्ट्र जनता करणार
संयम आम्ही ठेवणार
बदनाम नाही करणार
महाराष्ट्राचा खरा इतिहास
सार्या भारताला ठाऊक
कधी केले नाही छलकपट
मन आहे निष्कपट,निष्कलंक
येईल महाराष्ट्राचे वैभव
धीर थोडासा धरून
जातील दिवस दु:खाचे
सुख येईल परतून
