शूरवीर संभाजी
शूरवीर संभाजी
जन्म घेऊन राणी सईबाई पोटी
आनंदमयी पुरंदर किल्ला झाला
संभाजी नाव ठेविले माता-पित्यांने
शिक्षण घेऊन संभाजी शूरवीर झाला
चौदाव्या वर्षात बुधभूषण ग्रंथ लिहूनी
एकशे वीस युद्धे यशस्वी पराक्रम झाला
अल्पकाळात मराठा साम्राज्य विस्तार
गनिमी काव्याचा पुरेपूर वापर झाला
असामान्य शौर्य अजोड पराक्रम नीती
मराठा साम्राज्याचा वीर राजा तू झाला
अचाट अधीर अनेक प्रभुत्व करूनी तू
निर्भयतेने चातुर्याने मोठा योद्धा झाला
मोठ्या संकटांना सामोरे जाऊन लढला
स्वराज्याचा मानसन्मान हा सर्वत्र झाला
पित्यासारखा अद्भूत इतिहास घडविला
अपयशी संभाजी तू कधी नाही झाला
