आपली माणसं
आपली माणसं
आपली माणसं आपलीच असतात,
कधी हसत खेळत,तर कधी रूसतात,
भांडतात, झगडतात ,रागावतात,
किती दूर असली तरीही हॄदयात वसतात.
आनंदी क्षण हलकेच वेचतात,
दुःख:द प्रसंग आपल्यासोबत जगतात,
कठिण समयी सोबत उभे ठाकतात,
आपली माणसं आपलीच असतात.
*************************
