सजली नवी ही पहाट..
सजली नवी ही पहाट..
रातकिड्यांची किरकिर त्यात कोंबडा आरवे,
स्पर्शुनी थंडगार वारा गृहिणीस सांगे झटक आळस
उठ कामा लाग तू जोमाने सजली नवी ही पहाट..
स्वप्नि पडलेले काही प्रश्न,शब्दांचे सुप्तमनी काहूर
कानी विद्यार्थ्यांच्या सांगे घड्याळाचा तो गजर,
उठ लाग तू अभ्यासा जोमाने सजली नवी ही पहाट..
रात्रभर झोप नाही भीती कोरलेली मनावर
त्यावर औषधांचा भडिमार,
डोळा लागला कुठे तर
झाला पक्षांचा किलबिलाट कानी रुग्णांच्या येऊनी सांगे
नको जाऊ तू खचून,बरा होशील लवकरी फक्त एक काम तू कर
इथून गेल्यावर घरी झाडे लावा भरपूर,
होईल आम्हास ही घर
येईल ऑक्सिजनची लाट,
चल उठ लवकरी सजली नवी पहाट...
