उत्सव बाप्पाचा
उत्सव बाप्पाचा
1 min
187
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला
होतसे बाप्पाचे आगमन
ढोल ताशे गुलाल आणि
होईल फुलांची उधळण
पायघड्या रंगावली
जरी कोरोना सावट
मखर मनमोहक,
रोषणाई सजावट
मेघ सरी स्वागताला
सौदामिनी ताशा वाजे
सूर्य चंद्र आरतीला
वक्रतुण्ड नाम साजे
शुभ कार्यात प्रथम
देव प्रज्ञेशाला मान
कोणत्याही कार्यारंभी
असे लंबोदरा स्थान
शिवपार्वतीचा पुत्र तुम्ही
आहात दैवत आपण बुद्धीचे
चौदा विज्ञांचे सूत्र हाती
कल्याण करता सर्वांचे
बुद्धिदाता तू सुखकर्ता
चौसष्ट कला आत्मसात
शुभारंभी पुजतो तुला
डोई आशिर्वादाचा हात
