राम जन्मला
राम जन्मला
आनंदात रममानी देई
दुसर्यास आनंद
सूर्यवंशात जन्मला,
लोकराम रामचंद्र
आज्ञाधारी, बंधूप्रेमी,
राजधर्मी ,एकपत्नी वृत्ती
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम,
विष्णू अवतार रघुपती
धर्म अर्थ व काम
जाणी तिन्ही पुरुषार्थ
ऋषी मुनींच्या सानिध्यात
घडे रामास परमार्थ
राम-सीता-लक्ष्मण
वचनपूर्ती करण्यास
भोगे चौदा वर्षांचा
अनपेक्षित वनवास
रावण वधाने दिला युद्ध विराम
क्षत्रिय वृत्तीने केले सीतेस मुक्त
प्रजा शंकेने पीडा होई रामास
त्यागुनी सीतेस झाले श्रीराम विभक्त
वाल्मिकी लिखित महाकाव्य रामायण
लव कुश स्वयं मुखातून प्रचार करीत
माता सीता करी प्रवेश पृथ्वीच्या उदरात
देह त्यागूनी श्रीराम विलीन होई विष्णूत
