STORYMIRROR

Pratik Tarsekar

Inspirational

3  

Pratik Tarsekar

Inspirational

समानतेचे हक्क

समानतेचे हक्क

1 min
238

26 नोव्हेंबर 1949 रोजी l

आपले संविधान अस्तित्वात आले ll

त्यानुसार भारतीय नागरिक l

जगण्यास निश्‍चिंत झाले ll

कलम 14 नमूद झाली l

कायदेशीर समानता सर्वांस मिळाली ll

धर्म वंश जात लिंग भेदभाव हे संपुष्टात आले l

याचे आधारस्तंभ कलम नंबर 15 झाले ll

कलम 16 उदयास आली l 

समान संधी प्राप्त झाली ll

17वी कलम जेव्हा बनली l

अस्पृश्यतेच्या कनपटात पडली ll

18 व्या कलमाचे निर्माण झाले l 

स्वार्थी पदव्या संपवून टाकले ll

गरीब-श्रीमंत समान झाले l

घरोघरी शिक्षण नांदले ll

संविधानाने हेच हक्क नागरिकांस बहाल केली l

समतेचे जन्म झाले असमानता खड्ड्यात गेली ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational