काळी रात्र
काळी रात्र
ही रात्र खूप अवघड आहे l
दिवस आशेने दृष्टी आभाळात पाहे ll
भयान अंधाराची भीती वाटते l
आईस आठवत मन फाटते ll ध्रु ll
जशी जशी रात्र होते l
हळूच सुटतात सर्व नाते ll
शुभचिंतक यांचे संभाषण संपून जातात l
पोट कसे भरू हे विचार नांदू लागतात ll
जीवन सोडणे सोपे वाटते l
आईस आठवत मन फाटते ll1ll
मनात वादळ नेहमीच असतो l
तार्यां त तिला शोधत बसतो ll
सगळे तारे सारखेच दिसतात l
दुर्दैव पाहुनी नुसतेच हसतात ll
एकच तारा दुखी वाटते l
आईस आठवत मन फाटते ll2ll
सकाळ झाली रात्र टळली l
लपून रडणं दिनचर्या बनली ll
कोकीळ आले गाऊ लागले l
मनातील वादळ शांत पडले ll
तुला दिलेले त्रास जसे आठवते l
अपराधी मन माझं सतत फाटते ll3ll
