वचन स्मरण
वचन स्मरण
तु माझी जिजाऊ आहेस,
मी तुझा शिवबा ठरणार l
प्रत्ययास संकट आल्यास,
ढाल तलवार होणार ll
दिलेली वचने तुला,
मला शासन असतीन l
उल्लंघन त्याचे झाले तर,
माझे देहच नसतीन ll
तूच माझी प्रेरणा,
तू स्वप्नपूर्तीची आग l
माझी सरगम तू ,
मी तुझे राग ll
एकदा म्हण तर आई,
चंद्र नाही आकाश तोडणार l
एकदा बोल तर नाही
मोह काय प्राणच सोडणार ll
