STORYMIRROR

Pratik Tarsekar

Tragedy

3  

Pratik Tarsekar

Tragedy

आई

आई

1 min
214

आज दिवस आहे तुझा

पण तू कुठे दिसत नाही

मनात करोडो आकांक्षा आहेत

साठवून ठेवता येत नाही

वाटतं की तू बाजूलाच आहेस

पण हाक तुझी येत नाही

अण्ण फक्त पोट भरत आहे

पण स्फूर्ती त्यातून मिळत नाही

काटे घड्याळी चे फिरते आहेत

वेळ चांगलं येतच नाही

होते हजारो दवाखाने

पण स्वास्थ्य कुठे सापडले नाही

आले हजारो हात पाठ थोपटायला

बिन स्वार्थी कोणीच नाही

जे स्वार्थी नाहीत

त्यांवर विश्वास होतच नाही

नियतीने केलेला हा वार

चिमुकल्या जिवास सांभाळत नाही

संरक्षण गेले माया हरलो

ममता शोधुन सापडली नाही

गेले ते सुख-समाधानाचे दिवस

आई तुझ्याविना माझे जगच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy