STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational

3  

Sapana Thombare

Inspirational

राष्ट्रसंत तू होऊन गेला

राष्ट्रसंत तू होऊन गेला

1 min
147

माणिक उर्फ तुकडोजी नाव तुझे

मोझरीत गुरुकुंज आश्रम करुनी

 निर्माण करूनी संतसाधू संघटना

राष्ट्रसंत तू होऊन गेला..........

 

 भवनात राष्ट्रपतीच्या खंजिरी वाजवूनी

 प्राप्त केली राष्ट्रसंत होण्याची पदवी

 लोककल्याणाचा विचार मनी धरुनी 

राष्ट्रसंत तू होऊन गेला..............


 खेड्या खेड्यांत जाऊन कीर्तन करुनी

 पेरत बीज समाजात नववीचराचे तू

 स्वयंपूर्ण खेडे खेडे व्हावे म्हणून झटला

 राष्ट्रसंत तू होऊन गेला..........


 अंधश्रद्धा निर्मूलन जातिभेद मिटावे 

 देश-विदेशात हिंडून विचार मांडले

 जनजागृती करूनी भजन कीर्तनाने 

राष्ट्रसंत तू होऊन गेला............


 ग्रामगीता लिहून तुझे विचार मांडले 

 'तुकड्या म्हणे' म्हणेने अनेक ग्रंथ लिहून

 संत, भक्त, कवी, समाजसुधारक होऊनी 

 राष्ट्रसंत तू होऊन गेला.............


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational