STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

पैसा

पैसा

1 min
217

गरिबीवर होते

पैशाने मात

म्हणून करू

नकोस उतमात


पैशाच्या मागे 

नुसतं धावून

नको जाऊ

लांब साऱ्यांपासून


पैशाचा वेळीच

मोह आवरावा

गरजेपुरता नक्कीच

साऱ्यांनी कमवावा


पैसा मिळवावा

कौशल्याच्या जोरावर

संयम ठेवत

थोडा मनावर


असेल तुमच्याकडे

जर पैसा

रिकामा करावा

दानाने खिसा


मिळतील खूप 

सारे आशिर्वाद

आहे सत्य

हे निर्विवाद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational