आई
आई
घडावं मी तुझ्या हातून
माझं अडावं तुझ्या वाचून
हो नाही म्हणता - म्हणता
जग बघावं तुझ्याच नजरेतून
तुझं बोट धरून चालता -चालता
ते निसटलं तुझ्या हातून..
हे कधी कळलंच नाही
आठवण होते तुझी जगता -जगता
तेव्हा सुटलेलं बोट निहाळतांना
बालपण आठवते आई
संपूनही उरतो तुझा जिव्हाळा
तुझी माया हीच खरी पाहिली शाळा
असल्यावर कळत नाही..
कळल्यावर दिसत राही
नसूनही दिसत राही....
भास हा पिच्छा सोडत नाही
संपता संपत नाही गं..!
माया तुझी "अमर" आई..
