अबोल प्रीत
अबोल प्रीत
मनातील भावनांचा हा खेळ
का संपत नाही?
तुझा असा हा अबोला मला
जीवंतपणी फासावर चढवत राही
मृगजळसारखी ऐकटीच वाहिली
पुन्हा नवीन किनाऱ्याच्या शोधात
मात्र रोजच जळली.. क्षणभर गळली
पण तुला मी कधीही न कळली
माझ्या दुबळे पणावर जाऊ नको
संय्यमही तितकाच प्रखर आहे
उगाच राख रांगोळीचा सडा नको
सावरू बघते आयुष्याला पुन्हा ऐकदा
तूच असा होरपळू नको
वाऱ्याच्या वेगाने रे..
विरहाचा नशा सोड तू आता..
जीवही तुझवीन सुटत नाही रे..
मी वेडी आजही...
तुझ्या प्रेमाची गाणी गाते
या खडतर वळणावर..
पुन्हा हात हाती देते
वळून बघ तिथेच आहे..
तू सोडून गेलास जिथे
सोड हा अबोला किती देशील बहाणे..
ना उरले आता शब्द आणि गऱ्हाणे
जीव ओवाळीते ही वाटसरू "तुजवर"
विसरून साऱ्या वेदनांचे "गुन्हे "

