तडजोड
तडजोड
आयुष्य म्हणजे केवळ तडजोड
जगूनही अपूर्णच वाटत राही
हव्यासाची निव्वळ धडपड
माणुसकीच्या नावाने जन्मजात वाही
आयुष्य म्हणजे केवळ तडजोड
कोण माझा? अन् कोण परका?
निर्वाणाला स्पर्श हा भाभडा
असक्तीच्या काळिमेतला बोका
आयुष्य म्हणजे केवळ तडजोड
सरणावर अडलं आयुष्य क्षणभर
आठवतांना तीची एकेरी रडरड
मला मुक्ती तीला वीरक्ती जन्मभर
आयुष्य म्हणजे केवळ तडजोड
जीवनाच्या उतारार्धातला काळ
टिपून घ्यावा हलकेच नजरेआड
बोबड्या बोलात जगण्याची ती वेळ
