योगदान माझे देशासाठी
योगदान माझे देशासाठी
याच मातीत आम्ही जन्मलो
बाळगू भारताचा अभिमान
देशाप्रती ऋण फेडण्यासाठी
देशसेवा व्रताचा करू सन्मान..१!
रक्तदान करून सेवा करू
गरजवंताला होईल उपयोग
माणुसकीची भावना जपून
उपयोग होईल हा योगायोग..२!
नकोच गंडेदोरे, बाबा बुवा
विज्ञानाची धरूनिया कास
सार्वजनिक ठिकाणी जाऊन
जनजागृती करूया खास...३!
अनाथ मुलांना करू मदत
वाढदिवस साधेपणाने साजरा
तोच पैसा देऊ वृद्धाश्रमाला
पाहू या चेहरा त्यांचा हसरा...४!
देशासाठी असावी आपुलकी
वीज,पाणी वापरू या जपून
वृक्षारोपण, स्वच्छता पाळून
योगदान देऊ देशासाठी हसून..५!
