किल्ल्यांचे आत्मकथन
किल्ल्यांचे आत्मकथन
ढासळल्या बुरुजातून आवाज गर्जतो
शिवरायांच्या कर्तृत्वाचा दावा
हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात दरवळतो
आई भवानीच्या अस्तित्वाचा छावा
जयघोष भवानीचा आता रोजच तडफडतो
जेव्हा किल्ल्यास तू ताजमहाल समजतो
हृदयात शिवबा अन् बुरुजावर प्रेयसी रेखाटतो
खरं सांग काय तू स्वतःला शिवाचा वारस समजतो
माणसा नीट वाच इतिहास एकदा
स्वराज्यासाठी मावळ्यांचा ताफा मिटला
आजच्या पिढीत सदा सर्वदा
तरुणाईत बटल्यांचा तोफ पेटला
मोडकळीस आलेला बुरुज रडला
राज्यांचं अस्तित्व जपतांना
बुरुजातील प्रत्येक कोपरा पुटपुटला
संवर्धनाचा प्रश्न मांडतांना
