संस्कार
संस्कार
मोठ्यांचा राखत मान
मान मिळवावा जगात
जगात राखुनी भान
भान संस्कारांचे मनात
मनात निंदा नको
नको वापराया अपशब्द
अपशब्द दुखवती मन
मन होई निःशब्द
निःशब्द करी व्यक्तीस
व्यक्तीस असता अहंकार
अहंकार स्वार्थी बनवते
बनवते सद्गुणी संस्कार
संस्कार सुविचारांची खाण
खाण आपल्या संस्कृतीची
संस्कृतीची शिकवण मिळे
मिळे शिदोरी जीवनाची
जीवनाची संस्कार पुंजी
पुंजी पडे उपयोगी
उपयोगी आणता होई
होई जगात कर्मयोगी
