STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Inspirational

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Inspirational

संघटीत हो तरुणा

संघटीत हो तरुणा

1 min
316

जीवनात तारुण्य हे

सामर्थ्यशाली रोमांचकारी

भूतकाळी डोकावून बघ

कार्य अलौकिक क्रांतिकारी

असंतोषातून अमृताने

पैजा जिंके ज्ञानेश्वरी

उठ संघटित हो तरूणा

घे तू गगनभरारी

स्वराज्याचे करण्या सुराज्य

देह झिजव चंदनापरी

प्रगती योग्य दिशेने होण्यास

जा उद्योगांच्या आधारि

आर्थिक दृष्ट्या होण्यास उन्नती

कर तंत्रज्ञानाचा वापर

प्रदूषण रोखण्यास

कर मोहीम वनीकरण युद्धपातळीवर

तुझे परमकर्तव्य

करणे देश सीमेचे संरक्षण

समाज परिवर्तनात आहे

तुझे विशेष स्थान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational