STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Inspirational

आयुष्य नावाचा चित्रपट

आयुष्य नावाचा चित्रपट

1 min
235

जगाच्या या फलकावर

आयुष्य नावाचा चित्रपट

राईटर, डायरेक्टर, प्रोडुसर, तो

आपण सारेच ॲक्टर असतो..

भूमिका साऱ्यांचीच वेग वेगळी

ज्याची त्यालाच निभवायची असते

कोणी येतो.. कोणी जातो

एन्ट्री एक्झिट ठरलेली असते..

हसणं, रडणं, प्रेम, दुरावा

साराच मसाला भरला असतो

आयुष्य नावाच्या चित्रपटास मात्र

वन्स मोअर कधीच नसतो..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational