STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

4  

Manisha Patwardhan

Inspirational

माझी माय

माझी माय

1 min
303

मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


अभंग असे प्रेम लाभले

पुन्हा जन्म मिळो तुझ्या पोटी

अभंग गीत मी आळविते

मातृदेवीची महती मोठी


गुरू लाभला तुजसारखा

माझीच आहे ललाट रेखा

गुरूची महती मनी दाटे

तुझी सर न माझ्या नखा


नीर येते नयनांमधुनी

आठवणीत मन रंगते

नीर नदीचे संथ वाहते 

त्यामध्ये प्रतिबिंब पाहते ...


सूर तुझा ग कानी घुमतो

अंगाई गीत .. आठव येतो

सूर मारूनी मी अंगावर

बाल होऊनी मिठी मारतो ...


भाव मनीचे तरल झाले

आठवाने अश्रू ओघळले

भाव तुझा ग मनात मोठा

आई होता मज समजले ...


अभंग ... भंग न पावलेले , गीत प्रकार

गुरू ... मार्गदर्शक , मोठा

नीर ... अश्रू , पाणी.. जल

सूर ... संगीताचे , झेप

भाव ... भावना , किंमत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational