STORYMIRROR

Aruna Honagekar

Inspirational

4  

Aruna Honagekar

Inspirational

फळा

फळा

1 min
256

विद्येची जननी असे शाळा

जिच्या साठी जरूरी असे 

खडू आणि फळा। 


 दिसाया असे जरी मी काळा

विद्यार्थ्यांच्या भविष्याला

देतो मी उजाळा। 


सुंदर वळणदार अक्षरांनी

सजतो मी

कल्पक चित्रांनी

रंगतो मी। 


दिनांक, सुविचारांनी

नटतो मी

गणिताच्या आकडेमोडी ने

कळतो मी। 


शिक्षकांचे अस्त्र असे मी

शिक्षणाचे शास्त्र असे मी

होता गर्व केवढा, 

इंटरनेट च्या युगात

लोप पावत चाललोय

म्हणून काढतो आज गळा। 


एकच सांगणे असे आज

ज्ञानाने वाढतो संस्कृतीचा गळा

फळयाने फुलतो विद्येचा मळा। 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational