STORYMIRROR

Jyoti Druge

Abstract

4  

Jyoti Druge

Abstract

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी

1 min
1.1K

आम्ही सावित्रीच्या लेकी

आमची चालती छान डोकी

राहतीआमचा वास तिन्हीं लोकी

अप्सरांचे सौद्य आमच्या पुढती फिकी ।।१।।


आम्ही सावित्रीच्या लेकी

चालवी संसाराची गाडी दोन चाकी

सदैव नम्रतेने वाकी

स्वकर्तुत्वाचा तोरा आमच्या नाकी ।।२।।


आम्ही सावित्रीच्या लेकी

शिक्षणाचे दान दारोदारी टाकी

ताई, माई, बाई, काकी

निर्भयता सक्षमीकरण अजूनही बाकी ।।३।।


आम्ही सावित्रीच्या लेकी

बलात्कार, छेडछाड झाली डोकेदुखी

जिवंत आगीत झोकी

फक्त जाहती निषेध नाकोनाकी ।।४।।


आम्ही सावित्रीच्या लेकी

उंच भरारी आकाशी घे की

जगात कौतुक अजून बाकी

सगळे तुझ्या चरणी वाकी ।।५।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract