पाहिल प्रेम
पाहिल प्रेम


प्रेम म्हणजे काय??
एक असा भाव जो
अंतरंगी तार छेडूनी जातो
काही अश्या, की तो व्यक्ति
मनात कायमच घर करुनी राहातो
दिवस रात्र डोळ्यापुढे
तीच प्रतिमा दिसते
स्वप्नातसुद्धा तिच्याच
सहवासातच बागडत असते
स्पर्शाने तिच्या,
हृदयाची स्पंदने वेग धरतात
नजरेचा एक कटाक्ष
टाकून वशीभूत करतात
आठवण येता आपोआप
गालावरी हसू बहरते
भेटाया पुन्हा पुन्हा
मन तळमळ करते
रमता आठवणी तिच्या ना
राही वेळेचे भान
त्रास होइ तिला
अणि जळतो आपला प्राण
म्हणतात प्रेमात बुडून जो
सारेकाही हरतो
तोच ह्या प्रेमाचा इतिहासात
अजरामर ठरतो