STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy

बोलतो मी वृक्ष

बोलतो मी वृक्ष

1 min
202

गोड गोड फळ

चाखतोस खरं

गरज संपली

की मारतो बरं


स्वतः मी जळून

तू भाकरी खातो

खळगी भरली

मग लाथ देतो


हिरव्या रानात

हिंडतो खुशाल

गरज सरली

की घेतोस बल 


माझ्याच पासून

औषध बनतो

निरोगी राहून 

मलाच मारतो


स्मशान भूमीत

शरीर जळतो

तुझ्या बरोबर 

मी राख होतो


झाडांना मारून

हानी का करतो

पाऊस रुसला

की तू दोष देतो


उन्हातान्हात मी

सावलीत घेतो

गरज संपली 

की कुऱ्हाड घेतो 


बोलतो मी वृक्ष 

जगू दे आम्हास

बस कर पाप

विनंती तुम्हास 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy