सावट
सावट
भयाचे ते सावट करते पाठलाग
अभय त्याच्याशी सांगते लागेबंध
सतत काहीतरी जाणवते अंतरी
मनाची काया का सलते युगांतरी
निःशब्द होऊनी जणू मागते नभास
अबोल मनीचे स्वप्नवत ते आभास
भयाच ते सावट अन रिते वादळवाट
काळजाची हाक अन निर्भयी ती साथ
