प्रतिशोध...
प्रतिशोध...
पेटलेल्या भावनांचा दाह ,
विझता विझेना ,
फुंकर घालता पेट घेतो ,
प्रतिशोधाचा हा वणवा थमेना ...
घडून गेला संग्राम ,
रक्तच रक्त सांडले अंगणा ,
निखारे डोळ्यात धुमसत ,
फुंकर घालता पेट घेतो ,
प्रतिशोधाचा हा वणवा थमेना ...
जीव जाता टाहो फुटतो ,
आनंद कुणालाही मिळेना ,
रक्तबंबाळ मन गहिवरले ,
फुंकर घालता पेट घेतो ,
प्रतिशोधाचा हा वणवा थमेना ...
ओंजळीत घेता जीवाला,
पश्चाताप करीत प्राण गमावला ना,
घे माघार तुच थोर आहेस बघ,
फुंकर घालता पेट घेतो ,
प्रतिशोधाचा हा वणवा थमेना ...