STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy

स्वातंत्र्य की पारतंत्र्य

स्वातंत्र्य की पारतंत्र्य

1 min
201

अजून कुठे स्वातंत्र्य मिळाले आहे

लोकांच्या समोर अंगावरती वार करत आहे 

भर रस्त्यावर हैवान अब्रू लुटत आहे

निर्भया सारखी मुलगी जीवाला मुकत आहे


अजून कुठे स्वातंत्र्य मिळाले आहे

बळीराजा शेतात मर मर मरत आहे

तरीही पिकाला योग्य भाव कुठे मिळत आहे

कर्जामुळे शेवटी फाशी घेत आहे


अजून कुठे स्वातंत्र्य मिळाले आहे

कष्टाचे चीज करून मुलांना वाढवत आहे 

आईवडील हवे नको ते लाड पुरवत आहे

शेवटी मुले त्यांना वृध्द आश्रमात पाठवत आहे


अजून कुठे स्वातंत्र्य मिळाले आहे

दुष्मनांचा खात्मा करून रक्त सांडत आहे

कुठुंबाला सोडून सीमेवर लढत आहे

भारतभूमीच्या रक्षणासाठी हा जवान ठामपणे उभा आहे


अजून कुठे स्वातंत्र्य मिळाले आहे

या मंत्र्यांना जनताच निवडून देत आहे

तुमच्या आमच्या मतदानाचा काय उपयोग आहे

हे राजकारणी एका रात्रीत पक्ष बदलत आहे


अजून कुठे स्वातंत्र्य मिळाले आहे

भ्रष्टाचार, अत्याचार , बलात्कार वाढतच आहे

चिंतेने माणूस हैराण आणि घाबरलेला आहे

सत्त्यात्तर व्या स्वातंत्र्यदिवशी मला अनेक प्रश्न भेडसावत आहे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy