STORYMIRROR

Jitendra Sonawane

Tragedy Others

3  

Jitendra Sonawane

Tragedy Others

बाईपण

बाईपण

1 min
163

बाईपणाचे जगणे, नकोसे वाटते गं

होईल बलात्कार,क्षणोक्षणी वाटते गं


ऐकून रोज रोज , आन्याय अत्याचार 

या लिंगपिसाटांची, भीतीच वाटते गं


रोखून घाण नजरा, न्यहाळून ते पाहती

अंगावर वस्र आसुनी, उघडीच वाटते गं


वरदान म्हणू की श्राप, माझे मला कळेना

स्त्री जीवन हे मजला, श्रापीत वाटते गं


पुरूषी जन्म आहे , बाईच्याच उधरात

पुरूषांना जन्म देणे, नकोसे वाटते गं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy