रिमझिम पाऊस
रिमझिम पाऊस
1 min
142
सर सर सर सर सर सर सर सर
वाहु लागला वारा
वारा सोबत बरसु लागल्या
रिमझिम रिमझिम धारा
आकाश भरले काळ्या ढगांनी
किलबीलाट केला बहुरंगी पक्षांनी
मोरानेही फुलवीला पिसारा
आनंदाने नाचून सारा
वसुंधरेचा गंध पसरला
नदीनाला ओसंडून भरला
तूफानी झाला पाऊस मारा
सोबत पडल्या मोठ्या गारा
विज चमकली कडकडू लागली
झाडांची पाने फडफडू लागली
आनंदला हा परिसर सारा
उधान आलं लहान थोरा.
