पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
1 min
134
पुन्हा एकदा शाळेमध्ये जावे म्हणतो
आठवणींना पुन्हा उजाळा द्यावा म्हणतो
पुढे बसूनी दंगामस्ती करता आली नाही
आज शेवटच्या बाकावर दंगा घालावा म्हणतो
तास बुडवूनी माळावरती मैफील जमत होती
एकदा पुन्हा माळावरती जावे म्हणतो
ती मला पाहते कि तुला पाहते ही चढाओढ होती
पुन्हा एकदा तीला भेटण्या जावे म्हणतो
अभ्यास पूर्ण असूनही जे माझ्यासाठी छडी खात
त्या जीवलग मित्रांना मीठीत घ्यावे म्हणतो
पाठ कविता कधीच नव्हती छडी हातावर पडत होती
तीच छडी आज पुन्हा हातावर घ्यावी म्हणतो
प्रत्येक विद्यार्थी घडला पाहीजे ही तळमळ शिक्षकांची
त्या गुरूजनांच्या चरणावरती मस्तक ठेवावे म्हणतो.
