STORYMIRROR

Jitendra Sonawane

Others

3  

Jitendra Sonawane

Others

फुलहार वाहिले

फुलहार वाहिले

1 min
234

माझ्याच देहाला मी

जळताना पाहिले

माझ्याच चितेवरती

फुलहार वाहिले

चितेवरतीजळत होता

अहंकार माझा

चितेवरती जळत होता

द्वेष मत्सर माझा

अहंकाराची राख

होताना मी पाहिले

द्वेष मत्सर अंगारावर

पोळताना मी पाहिले

चितेवरती जळत होता

लोभ माझा

जळतानाही

अभय मागत होता

क्रूरतेचा धूर झाला होता

त्या धुरातही

विनाश मागत होता

लोभी मनाला देहदान

करताना मी पाहीले

क्रूरतेला स्थीर शांत

होताना मी पाहीले

अज्ञान माझे अग्नीज्वाळांशी

खेळ खेळत होते

चंचलता विचलित होवून

आकाशाकडे झेप घेत होते

अज्ञानाला प्रज्ञावान

होताना मी पाहिले

चंचलतेला स्थिर

होताना मी पाहिले.


Rate this content
Log in